अखेर डेगवे गावातील बीएसएनएल टॉवरची बॅटरी बसविली. ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांच्या प्रयत्नांना यश.

अखेर डेगवे गावातील बीएसएनएल टॉवरची बॅटरी बसविली.  ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांच्या प्रयत्नांना यश.

सावंतवाडी.

   बीएसएनएलची बॅटरी बसविण्यात यावी यासाठी डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी 15 ऑगस्टला बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी बीएसएनएल उपमहाप्रबंधक आर. वि. जन्नु यानी महीनाभरात बॅटरी बसविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर दिले होते. आश्वासननुसार, बीएसएनएलने डेगवेत टॉवरची बॅटरी बसवली आहे. त्यामुळे देसाई यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
    मोबाईल टॉवरची बॅटरी न बसवल्यामुळे १५ ऑगस्टला सावंतवाडीतील बीएसएनएल कार्यालयासमोर डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना विभाग प्रमुख विजय शंभा देसाई यांनी उपोषण केले.उपमहाप्रबंधक आर. वि.जन्नत यांनी महीनाभरात बॅटरी बसविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे देसाई यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी गजानन नाटेकर, अशोक दळवी, मंगलदास देसाई, सुनिल देसाई तसेच बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते. डेगवे गावामध्ये 4 वर्षापूर्वी बीएसएनएल चा टॉवर बसवलेला असुन गेली 2 वर्ष बॅटरी चोरीला गेलेली आहे लाईट असली तरच रेंज येते नायतर रेंज येते नसल्याकारणाने याची वेळोवेळी सावंतवाडी बीएसएनएल ऑफिसला लेखी तोंडी सांगुन काही केलेले नाही फक्त तोंडी आश्वासन दिली होती ऑगस्टपर्यंत बॅटरी न बसवल्यास १५ ऑगस्टला बीएसएनएल ऑफिस समोर उपोषणाला बसणार असा इशारा देसाई यांनी दिला होता. त्यानुसार देसाई यांनी उपोषण केले. आता बॅटरी बसविण्यात आल्याने देसाई यानी बीएसएनएल अधिकारी यांचे आभार मानले आहे.