देवगड रोटरी क्लब अध्यक्षपदी गौरव पारकर

देवगड रोटरी क्लब अध्यक्षपदी गौरव पारकर

 

देवगड

 

        देवगड येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी गौरव पारकर, सचिवपदी अनुश्री पारकर तर खजिनदारपदी दयानंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा प्रांतपाल अरुण भंडारे यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जुलैला सायंकाळी ७ वा. इंद्रप्रस्थ हॉल येथे होणार आहे. या निवडीमध्ये व्हाईस प्रेसिडेंटपदी अनिल कोरगांवकर, सार्जेंट अट आर्म अनिल गांधी, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी नरेश डामरी, जॉईंट ट्रेझर डॉ. उमेश पाटील, डायरेक्टर ऑफ कम्युनिटी सर्व्हिस रमाकांत आचरेकर, डायरेक्टर क्लब सर्व्हिस मनीषा डामरी, इंटरनॅशनल सर्व्हिस अशोक मुजुमले, डायरेक्टर ऑफ न्यू जनरेशन राजेंद्र भुजबळ, डायरेक्टर ऑफ पोलिओ प्लस डॉ. दत्तप्रसाद सावंत, चेअरमन मेम्बरशिप अनिकेत बांदिवडेकर, चेअरमन अॅडमिनिस्ट्रेशन श्रीपाद पारकर, चेअरमन रोटरी फाउंडेशन विजय बांदिवडेकर, चेअरमन सर्व्हिस प्रोजेक्ट प्रवीण पोकळे, चेअरमन पब्लिक इमेज शामल पोकळे, चेअरमन क्लब लिटरसी महेश घारे, चेअरमन फेलोशिप हनिफ मेमन, चेअरमन ऑफ हिस्टारिअन प्रकाश गायकवाड, डायरेक्टर व्होकेशनल सर्व्हिस मनस्वी घारे आदींची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यासाठी झोनल को ऑर्डिनेटर डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्यासह जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या विद्यमान अध्यक्षा सौ. मनस्वी घारे व सेक्रेटरी गौरव पारकर यांनी केले आहे.