राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी तनुश्री नारकर हिची निवड.
रत्नागिरी.
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 34 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा दिनांक. 25 ते 27 जुलै दरम्यान बीड येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुखच्या 4 तायक्वांडो पट्टुंनी सहभाग नोंदविला होता या मध्ये 56 ते 59 या वाजनी गटातमध्ये तनुश्री गणेश नारकर हिने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले,तसेच तनिष विनायक खांबे याने 52 ते 55 या वजनी गटातमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले ओम योगेश घाग 55 ते 59 या वजनी गटामध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले गंधर्वसुजित शेट्ये 73 ते 78 या वजनी गटामध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या तनुश्री गणेश नारकर हिची निवड 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान संभाजीनगर (औरंगाबाद)येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे.
या खेळाडूंना शुभेच्छा देण्याचा छोटेखानी कार्यक्रम नगरपंचायत देवरूख तायक्वांडो क्लब या ठिकाणी मा.आमदार शेखर निकम, अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, तहसीलदार अमृता साबळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, गटविकास अधिकारी भरत चौगुले, राज्य संघटनेचे खजिनदार व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मुण कररा, बारक्याशेठ बने, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, संतोष लाड, पप्पु शेठ नाखरेकर, हनीफ शेठ हरचीरकर, बाळू ढवळे, बापू गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, क्लबच्या अध्यक्षा स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, क्लबच्या उपाध्यक्षा ॲड. सौ. पूनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्य अण्णा बेर्डे, स्वाती नारकर, रुपाली कदम, अनुजा नार्वेकर, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमीत पवार, सिनियर खेळाडू सौरभ वनकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याचे माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने, माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम, तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे महा सचिव श्री.मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते)त्यांच्या यशाबद्दल राज्य संघटनेचे खजिनदार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, अकॅडमीचे अध्यक्ष परेश खातू, सदस्य दत्तात्रय भस्मे, सिनियर खेळाडू निखिल लाड, सिद्धी केदारी, गायत्री शिंदे, वेदांत गिडीये आदींनी शुभेच्छा दिल्या.