परुळे येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार.

परुळे येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार.

वेंगुर्ला.

   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अथक परिश्रम करून महिला भगिनींचे फॉर्म भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बहुमोल योगदान देणार्‍या परुळे बाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका यांचा ग्रामपंचायती च्या वतीने सन्मान करण्यात आला.
   यावेळी परुळे अंगणवाडी सेविका ऋतुजा राऊळ विनया बोवलेकर सुजाता देसाई, सुषमा वराडकर यांचा सन्मान करण्यात आला. योजना जाहीर झाल्यापासून अंगणवाडी सेविका यांनी या योजनेसाठी महिलांना अतिशय व्यवस्थित माहिती देऊन त्यांचे फॉर्म भरले तसेच बँक खात्यांची के.वाय सी. करणे याबाबत माहिती दिली. प्रत्येक वेळा महिलांना प्रत्यक्ष संपर्क साधून कागदपत्रे पूर्ण केले बाबत माहिती दिली. त्यामुळेच गावांतील प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला.
  यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, नमिता परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे आदी उपस्थित होते.