दुचाकी वाहन वितरकांनी नियमांचे अंमलबजावणी करा : नंदकिशोर काळे.
सिंधुदुर्ग.
जिल्ह्यातील दुचाकी वाहन वितरकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करा, अशा सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिल्या.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील दुचाकी वाहन विक्रेत्याची बैठक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. या बैठकीत दुचाकी वाहन वितरकास वाहनांची विक्री केल्यानंतर अनिवार्य असलेली HSRP नंबर प्लेट, Homologation portal वर उत्पादकाने दिलेल्या वाहनाच्या किमंती नुसार वाहनाच्या मोटार वाहन कराचा भरणा करणे, वाहनाची नोंदणी होताना वाहनाचा विमा व हेल्मेट संबंधीच्या नियामांची अंमलबजावणी तसेच मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत बनविण्यात आलेल्या नियम तरतुदीनुसार अभिलेख जतन करणे इत्यादी सूचना देण्यात आल्या.
बैठकीस उपस्थित सर्व दुचाकी वाहन वितरकास नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन सदर अंमलबजावणी होते किंवा. कसे याबाबत तालुकानिहाय नियुक्त करण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून नियमित तपासणी करण्यात येईल व यात दोषी आढळणाऱ्या वाहन वितरकांवर दंडात्मक तसेच व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्याची करण्याची कारवाई करण्यात येईल अशाही सूचना वाहन वितरकास देण्यात आल्या आहेत.