परुळे येथे मोफत एक्स रे तपासणी कार्यक्रम संपन्न.
परुळे
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 100 डेज कॅम्पेन मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिर परुळे बाजार येथे जिल्हा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत परुळे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मोफत एक्स रे तपासणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जोखीम ग्रस्त गटातील लाभार्थ्यांची चेस्ट एक्स-रे तपासणी करण्यात आली सदर कार्यक्रमा वेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे श्री. अमित सर, श्री. गंगावणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश जाधव, नितीन नाईक, ग्रा. पं.सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, पोलीस पाटिल जनार्दन पेडणेकर, सदस्य प्रदीप प्रभू प्रा.आ केंद्र परुळेचे आरोग्य सहाय्यक नागेश तोरसकर व सत्यवान मठकर, आरोग्य समुदाय अधिकारी वैष्णवी पाटकर, काजल परब, आरोग्यसेवक एस आर चव्हाण, मनोज दूधवडकर, आशा स्वयंसेविका कोमल मांजरेकर, रक्षित गोवेकर, राजलक्ष्मी परुळेकर, मदतनीस आरती परुळेकर इ.उपस्थित होते. सदर कार्यक्रमात 100 लाभार्थ्यांचे एक्स-रे तपासणी केली.