स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात उत्साहात.

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात उत्साहात.

 

     सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांनी सादर केलेले विविध कार्यक्रम या सोहळ्याचे आकर्षण ठरले. "द फेबल फेस्ट" ही थीम घेवून हा सोहळा रंगला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लेखिका सई लळीत यांच्या हस्ते झाले. यावेळी जेष्ठ पत्रकार सतीश लळीत, संस्थेचे संस्थापक रुजूल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर आदी उपस्थित होते.