वेंगुर्ला येथे आंतरमहाविद्यालयीन झोनल नेमबाजी स्पर्धा संपन्न.

वेंगुर्ला येथे आंतरमहाविद्यालयीन झोनल नेमबाजी स्पर्धा संपन्न.

वेंगुर्ला.

     वेंगुर्ला कॅम्प येथे बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित मुंबई विद्यापीठ कोकण झोन चार च्या नेमबाजी स्पर्धा उपरकर शूटिंग अकॅडमी येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन माननीय प्राध्यापक श्री.पी.के.पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री.एम.बी.चौगुले उपस्थित होते त्याच बरोबर प्राध्यापक जे.वाय.नाईक मुंबई विद्यापीठ कोकण झोन निवड समिती सदस्य, प्राध्यापक चंद्रकांत नाईक महाविद्यालय कोकण झोन निवड समिती अध्यक्ष, प्राध्यापक राम कदम महाविद्यालय कोकण झोन निवड समिती सदस्य, उपरकर शूटिंग रेंजचे एन.आय.एस प्रशिक्षक कांचन उपरकर, दीपक सावंत,सातार्डा हायस्कूलचे मुख्याध्यापक  प्रशांत सावंत तसेच  कमलेश कांबळे जिमखाना चेअरमन उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील महाविद्यालयीन नेमबाजांनी सहभाग घेतला होता.सदरच्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

मुलांच्या दहा मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात-
 
कु.शुभम संतोष साटम (कणकवली कॉलेज) प्रथम क्रमांक,
कु.वेदांत महेश सुतार (कणकवली कॉलेज) द्वितीय क्रमांक, 
कु.सिलविस्टर डुमिंग डिसोजा (एस.पी.के.एम सावंतवाडी) तृतीय क्रमांक,कु.प्रथमेश पांडुरंग पावसकर (कणकवली कॉलेज) उत्तेजनार्थ.
 
मुलींच्या पीप साईट एअर रायफल प्रकारात- 

कु.साक्षी डांगे (डी.बी.जे कॉलेज चिपळूण) प्रथम क्रमांक.
कु.सानिका गावडे (बी.के.सी वेंगुर्ला) द्वितीय क्रमांक.
कु.सानिका धरणे (बी.के.सी. वेंगुर्ला)तृतीय क्रमांक.
कु.सायली वाघाटे (कणकवली कॉलेज) उत्तेजनार्थ.

दहा मीटर एअर पिस्तूल प्रकार मुले-

कु.कमलेश रमाकांत केळजी (बी.के.सी वेंगुर्ला)प्रथम क्रमांक.
कु.अमोल धोंडू सावंत (बी.के.सी वेंगुर्ला) द्वितीय क्रमांक.
कु.पवन बबन कांबळे (बी.के.सी वेंगुर्ला)तृतीय क्रमांक.
कु.मंथन मदन सोमवंशी (बी.के.सी वेंगुर्ला) उत्तेजनार्थ.

दहा मीटर एअर पिस्तूल प्रकार मुली-

 कु.सानिका गावडे (बी.के.सी वेंगुर्ला) प्रथम क्रमांक.
कु.सानिका धरणे (बी.के.सी कॉलेज वेंगुर्ला) द्वितीय क्रमांक.
कु.मृण्मयी हुले (बी.के.सी कॉलेज वेंगुर्ला)तृतीय क्रमांक.
   सर्व विजेत्या खेळाडूंची रूपा रेल कॉलेज माहीम मुंबई येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.