होडावडे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

होडावडे येथे  युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

वेंगुर्ला

 

    वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे - सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी येथील अँथोनी डिसोजा (22) या युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अँथोनी याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवडाभरात सावंतवाडी तालुक्यातील चार युवकांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच होडावडे येथील युवकाने आपले जीवन संपवल्याने वाढत्या आत्महत्या चिंतेचे कारण ठरत आहे. समाजातील वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच युवकांसाठी समुपदेशन उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली.