सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ३.२ मीटर उंच लाटांचा इशारा....मच्छीमारांनी सतर्क राहावे; प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ३.२ मीटर उंच लाटांचा इशारा....मच्छीमारांनी सतर्क राहावे; प्रशासनाचे आवाहन


 

सिंधुदुर्गनगरी
 

     जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल किनारपट्टीदरम्यान २९ जुलैला रात्री ११:३० वाजेपर्यंत समुद्रात ३.१ ते ३.२ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.हवामान विभागाच्या या इशाऱ्याची दखल घेऊन मच्छिमार आणि मच्छिमार सहकारी संस्थांपर्यंत तातडीने माहिती पोहोचवण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, समुद्रात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.