सनातन संस्थेतर्फे सिंधुदुर्गात ६ ठिकाणी 'गुरुपौर्णिमा महोत्सव'....वेंगुर्ले येथील साई दरबार सभागृह येथे आयोजन
वेंगुर्ले
सनातन संस्था यंदाचा 'गुरुपौर्णिमा महोत्सव' हा 'रामराज्याच्या निर्मितीची दिशा' स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा उत्सव बुधवार, २९ जुलै या दिवशी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले अशा सहा ठिकाणी महोत्सव होणार आहेत.या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प. पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच 'रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा' या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयकफलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.दरम्यान श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे, देवगड दु. ३.३० वाजता, मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली वेळ दु. ३ वाजता, मराठा समाज भवन सभागृह, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ दु. ३.३० वाजता, दैवज्ञ भवन, मालवण सायं. ४ वाजता, साई दरबार सभागृह, वेंगुर्ला दु. ३.३० वाजता आणि बॅ. नाथ पै सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी दु. ३.३० वाजता यावेळेत हा गुरूपौर्णिमा महोत्सव होणार आहे. तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत 'ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव' आयोजित करण्यात केले आहेत. २९ जुलैला मराठी भाषेतील 'गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ https://www.sanatan.org/mr/gurupurnima या मार्गीकेवर (लिंकवरून) घेता येईल.
konkansamwad 
