सह्याद्री फाउंडेशनकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला बेडशीट भेट

सह्याद्री फाउंडेशनकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला बेडशीट भेट


 

सावंतवाडी
 

      पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशनने उपजिल्हा रुग्णालयाला बेडशीट भेट देऊन रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले. यावेळी फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने रुग्णांच्या समस्या व अडचणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवल्या जातील, असे आश्वासन दिले.यावेळी बोलताना सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ आणि जिल्हा बँकेचे संचालक व फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी फाउंडेशन नेहमीच तत्पर राहील, असे स्पष्ट केले. पालकमंत्री श्री. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला.याप्रसंगी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, फाउंडेशनचे ॲड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, सुनील खानोलकर, श्रीराम नाईक, सैनिक पतसंस्थेचे संचालक सौ. मानसी मनोज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पांडुरंग वजराटकर यांच्याकडे बेडशीट सुपूर्द करण्यात आले.