ओसरगाव येथे दारुसह १२ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

ओसरगाव येथे दारुसह १२ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

कणकवली 


     राज्य उत्पादन शुल्क कणकवली क्र. ०१ च्या पथकाने ओसरगाव टोल नाक्यावर गोवा बनावटीच्या दारुसह १२ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाचे पथक खाजगी वाहनाने गस्तीवर असताना त्यांना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेला बोलेरो पिकअप वाहन दिसून आला. या वाहनाची ट्राफिक पोलीसांसमवेत तपासणी केली असता वाहनावर वाहनचालक नसल्याचे निदर्शनास आले. वाहनाचा संशय आल्याने त्याची तपासणी केली गेली तेव्हा त्यामध्ये गोवा बनावटी दारु असल्याचे दिसले. वाहनात दारूचे असलेले एकूण ७९ बॉक्स  जप्त करण्यात आले. सदर  ७९ बॉक्स व बोलेरो पिकअप असा एकूण रु १२,८६,०००/- किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या गुन्हयातील अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. डी. पाटील यांनी केली तसेच दुय्यम निरीक्षक जे.एस.मानेमोड व संतोष घावरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस. चौधरी, महिला जवान एस. एस. कुवेसकर, जवान ए.टी.गावडे व ट्राफिक पोलीस हवालदार कॅलिस डिसोजा व नितीन चोडणकर होते. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. डी. पाटील करीत आहेत.