सावंतवाडीत अवैध मद्यसाठा जप्त, दोघे ताब्यात
सावंतवाडी
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर, खालसा पंजाबी धाब्यासमोर आज रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, इन्सुली पथकाने अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे अशोक लिलैंड कंपनीचे चौदाचाकी मालवाहू ट्रक क्र. AP-02-TE-5659 ची तपासणी केली असता वाहनामधून केबिनच्या मागे बनविलेल्या चोरकण्यामध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डच्या दारूने भरलेल्या एकुण १६५२ सिलबंद बाटल्या असलेल्या एकुण ८९ बॉक्सचा अवैध मद्यसाठा मिळाला आहे.
सदर प्रकरणी वाहन चालक नल्लाबोतुला जयराम (५६) अनंतपुरम, आंध्रप्रदेश व पल्ले पवनकुमार रेड्डी (३७) अनंतपुरम, आंध्रप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यामध्ये १०,३४,०००/- किंमतीचे मद्य व मालवाहू ट्रक सहीत एकुण २२,३४,०००/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई निरीक्षक मिलींद गरुड, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षकमिलिंद माळी, रणजीत शिंदे, वाहन चालक दिपक वायदंडे, जवान सतिश चौगुले, जवान एस. आर. सुर्यवंशी, जवान अभिषेक खत्री यांनी केली
konkansamwad 
