विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच जीवनात संस्कारांना महत्त्व द्यावे : मधुरा दळवी......न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयात विद्यार्थी - शिक्षक गुणवगौरव समारंभ उत्साहात संपन्न
वेंगुर्ले
"विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच जीवनात संस्कारांना महत्त्व द्यावे. अभ्यास करताना वाचन, चिंतन, मनन करावे. कृतज्ञतेची भावना सर्वांप्रती मनामध्ये बाळगावी. आणि आयुष्यात खूप मोठे व्हा. यश संपादन करा." असा सल्ला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. मधुरा दळवी यांनी विद्यार्थ्यांना दिला."न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयात विद्यार्थी - शिक्षक गुणवगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.सुरुवातीस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्वमी भिसे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. अध्यापक श्री. दीपक बोडेकर यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्था चेअरमन श्री. विरेंद्र कामत आडारकर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. विरेंद्र कामत आडारकर यांनी सांगितले की, "अपार कष्ट करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे, पालकांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा". विद्यार्थ्यांच्या गुणांना वाढण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील. तर "प्रामाणिक प्रयत्न व मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन करून स्वतःचे व शाळेचे नाव मोठे करा" असा सल्ला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित मान्यवर पंचायत समिती सदस्य सौ. साक्षी नावेकर यांनी दिला.याप्रसंगी गुणवता प्राप्त विद्यार्थ्यांमधून कुमारी वैष्णवी सुरेश चिपकर व कुमारी सेजल नितीन रेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. सावळाराम कांबळी सर व श्री. श्रीकृष्णा पेडणेकर यांनी समायोचित भाषणे केली. या कार्यक्रमास संस्था सेक्रेटरी श्री. रमेश नरसुले, संस्था कार्यकारिणी सदस्य श्री. राघाकृष्ण मांजरेकर, श्री. सुजित चमणकर, श्री. गोविंद मांजरेकर, श्री. महेश दळवी, श्री. रमेश नावेकर, माजी मुख्याध्यापक श्री. सावळाराम कांबळी, श्री. मधुकर कुबल, सौ. उल्का वाळवेकर, सौ. मनाली कुबल, सौ. दिव्या नवार, सौ. अमिता मळगावकर, सौ. प्रतिमा कासकर, श्री. नितीन रेडेकर, सौ. हर्षदा जुवलेकर, श्री. महेंद्रनाथ कुर्ले, श्री. लक्षाधीश केरेकर तसेच अन्य पालक व संस्था हितचिंतक उपस्थित होते.श्री. लक्षाधीश केरेकर, कुमार नैतिक नाईक व गीतमंचाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सौ. भिसे मॅडम यांनी पारितोषिकांचे वाचन केले. श्री. बोडेकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्था सेक्रेटरी श्री. रमेश नरसुले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
konkansamwad 
