सावंतवाडीतील इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.....परराज्यातील अवैध दारू वाहतूक करणारी कार जप्त, ६.३१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
सावंतवाडी
राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने सावंतवाडी तालुक्यातील जुन्या पत्रादेवी-बांदा रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ कारवाई करत परराज्यातील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनासह एकूण 6,31,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.इन्सुली पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 25/07/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता ही कारवाई करण्यात आली.यावेळी गोवा बनावटीची विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या ग्रे रंगाच्या ग्रँड i10 कार क्र. MH-12-NE-9110 ची तपासणी केली असता गाडीच्या मागील सीटवर व डिकीत 25 बॉक्स म्हणजेच 212 बाटल्या अवैध दारू आढळून आल्या.या प्रकरणी महेंद्र कैलास कोतवाल वय 36, रा. हनुमानवाडी, अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे याला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे 2,81,760 रुपये तर वाहतुकीसाठी वापरलेल्या कारची किंमत 3,50,000 रुपये असा एकूण 6,31,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, संदीप कदम, जवान नितीन वाहनचालक, दिपक वायवडे, सागर सूर्यवंशी आणि सतिश चौगुले यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.
konkansamwad 
