रा. कृ. पाटकर हायस्कूल व रा. सी. रेगे जुनियर कॉलेजचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला
दरवर्षीप्रमाणे रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा .सी .रेगे ज्युनिअर कॉलेज तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रम वेंगुर्लाचे स्नेहसंमेलन प्रमुख पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री राजन गावडे व स्नेहसंमेलनाध्यक्ष माजी गटशिक्षण अधिकारी मा श्री रमेश पिंगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून योग्य दिशेने पाऊल टाकावे. तसेच स्वतःला घडवण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार करावी असे उद्गार त्यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राजन गावडे, माजी गटशिक्षण अधिकारी श्री रमेश पिंगुळकर, मुख्याध्यापक एस .आर.धुरी सर, पवार गुरुजी, नंदन वेंगुर्लेकर, पालक वासुदेव केरकर, शालेय मुख्यमंत्री संकेत परुळेकर व सांस्कृतिक मंत्री अश्मिरा दोस्ती उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्ताविक श्री बोवलेकर सर तर शालेय प्रगतीचा अहवाल वाचन श्री धुरी सर यांनी केले .शाळेकडे ठेवलेल्या नलिनी दत्तात्रय वेटे यांच्या ठेवीतून व निर्मला नारायण परांजपे यांच्या ठेवीतून मिळालेल्या व्याजातून व शिक्षकांच्या देणगीतून आठवी ते बारावी प्रथम तीन क्रमांकांना हुशार व होतकरू 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये तर शाळेतील पाच विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. यावेळी बेस्ट कॅडेट मकरंद वेंगुर्लेकर याची निवड झाली तसेच धनश्री निकम साधवी भिडे, नवनीत मठकर हे आदर्श विद्यार्थी ठरले. यावेळी रांगोळी प्रदर्शनात प्रथम पाच क्रमांकांना रोख पारितोषिक देण्यात आली माजी शिक्षिका यशवंती सावंत यांचे स्मरणार्थ डॉक्टर सौ दिपाली काजरेकर यांनी मराठी विषयात प्रथम येणारे निर्जरा वेंगुर्लेकर हिला रोख 500 पारितोषिक दिले गेले. तसेच श्री वराडकर सर व श्री साळगावकर सर यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजन गावडे यांनी मार्गदर्शन करताना आपण नोकरी व्यतिरिक्त व्यवसायात चांगले करिअर करू शकतो असे सांगितले. यावेळी पवार गुरुजी, अ्ॅड वेंगुर्लेकर यांनी गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, कामत सर, अश्वता माडकर, संदीप परुळेकर व इतर पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बोवलेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोसावी सर यांनी केले.