मुंबईच्या चारूची यरनाळकर स्मृतिचषकात बाजी वेंगुर्ल्यातील कलावलय आयोजित यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला
वेंगुर्ल्यातील कलावलय आयोजित प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेच्या विजयाचा मान मुंबईतील अंग्रेश्वर चिऐटर्सने सादर केलेल्या 'चारू' या एकांकिकेने मिळवला. रोख रुपये पंधरा हजार रुपये व फिरता चषक, कायमस्वरूपी चषक, प्रमाणपत्र देऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरच्य्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या कलम ३७५' या एकांकिकेने द्वितीय तर कोल्हापूर येथीलच गायन समाज देवल क्लबच्या ऑलमोस्ट डेड' या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला.
या एकांकिका स्पर्धेत तब्बल १७ संघांनी सहभाग घेतला होता. सदर एकांकिकांचे सातारा येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी तुषार भद्रे व सुनील गुरव यांनी परीक्षण केले. परीक्षक या नात्याने बोलताना तुषार भद्रे म्हणाले की, अभिनेत्याने नेहमी तयार राहिले पाहिजे आपला आवाज शेवटच्या रसिकांपर्यंत न अडखळता पोहोचविणे हे त्याची सर्वांत मोठी जवाबदारी असते. रंगमंचीय अविष्कारात त्यालाच सर्वोच्च कामगिरी करावी लागते.प्रकाश योजना, नेपथ्य, पार्श्वसंगीत या सपोर्ट सिस्टीम आहेत. अतिघाई किंवा अतिअभिनय सोबतचा कलाकार व रसिकांचा रसभंग करू शकतो. त्यामुळे रंगमंचावर आल्यावर सर्व गोष्टींचे भान ठेवणे कलाकारासाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. जिंकण्यापेक्षा नाट्यानुभावासाठी नाटक करा. स्पर्धेची तयारी करताना सर्वांत पहिल्यांदा संहितेवर विचार करा. योग्य संहिता निवडा, त्याचा अभ्यास करा व नंतरच रंगमंचीय आविष्कार करा असे ते म्हणाले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे -
सांघिक प्रथम 'चारू' (अंग्रेश्वर चिएटर्स मुंबई), द्वितीय कलम ३७५० (परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर), तृतीय 'ऑलमोस्ट डेड' (गायन देवल समाज क्लब कोल्हापूर), उत्तेजनार्थ प्रथम पूर्णविराम (कलासक्त मुंबई), उत्तेजनार्थ द्वितीय 'निर्झर' (मुख्तलिख विएटर्स कोल्हापूर).
उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रचम सागर जेठवा (चारू अंग्रेश्वर विएटर्स मुंबई), द्वितीय वैष्णवी पोतदार (कलम ३७५' परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर). तृतीय- प्रमोद पुजारी (ऑलमोस्ट डेड गायन देवल समाज क्लब कोल्हापूर). उत्कृष्ट पुरुष अभिनय प्रवम विशाल दुराके ('ओळख' दृष्टी पुणे), द्वितीय प्रमोद पुजारी (ऑलमोस्ट डेड' गायन देवल समाज क्लब कोल्हापूर), तृतीय प्रथमेश धुर्वे (चारू' अंग्रेश्वर थिएटर्स मुंबई), उत्तेजनार्थ प्रथम साहीत देसाई (ऑफलाईन बी. की. चिएटर्स कुडाळ), उत्तेजनार्थ द्वितीय दीपक जानकर ('मशाल' समर्थ कलाविष्कार देवगड) उत्तेजनार्थ तृतीय योगेश कदम (इंटरोगेशन क्रिएटिव्ड कार्टी),उत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम जान्हवी जाधव (चारू अंग्रेश्वर बिएटर्स मुंबई), द्वितीय सानिका कुंटे ('ऑफलाईन' निर्मिती थिएटर कुडाळ), तृतीय- प्राची कात्रे ('ओळख' दृष्टी पुर्ण), उत्तेजनार्थ प्रथम कांचन परुळेकर (विठाई'
नाटकवेडे रत्नागिरी), उत्तेजनार्थ द्वितीय मंगल डिसोझा ('विवर' कलारंग मालवण देवगड) उत्तेजनार्थ तृतीय वर्षा जाधव ('चोली के पिछे क्या है- विएटरवाले मुंबई),सर्वोत्कृष्ट नेपथ्य : रमा कुलकर्णी, ऋतुराज कुलकर्णी (ऑलमोस्ट डेड),
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : ऑकार वर्णे (कलम ३७५),सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना: चेतन पडवळ (चारू).
कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाबू खामकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव सुनील रेडकर, पुणे जिल्ह्याचे निवृत्त शिक्षणाधिकारी तथा वेंगुर्लाचे सुपुत्र प्रकाश परब व परीक्षक तुषार मद्रे व सुनील गुरव व कलावलपचे पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय पुनाळेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कलावलय परिवारातील पदाधिकारी व सदस्यांचे विशेष योगदान ठरले.