केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माड्याचीवाडी स्वामी समर्थ मठाला भेट.
कुडाळ
केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. मठाचे संस्थान प्रमुख गावडे काका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ही भेट दिली. यावेळी गावडे काकांच्या हस्ते नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान श्रीपाद नाईक यांनी मठातर्फे राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. विशेषतः मठाने ८६ कुष्ठरोग्यांवर केलेले यशस्वी उपचार आणि त्यांना दिलेला पौष्टिक आहार यांसारख्या समाजोपयोगी कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. याच कार्यक्रमात नेरूर देऊळवाडा दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना अतुल बंगे यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, मठाचे अध्यक्ष एकनाथ गावडे, सुजय गावडे, पंकज कामत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
konkansamwad 
