वेंगुर्ला येथे सिंधुरत्‍न समृद्ध योजने अंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन मेळावा संपन्‍न.

वेंगुर्ला येथे सिंधुरत्‍न समृद्ध योजने अंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन मेळावा संपन्‍न.

वेंगुर्ला.

  वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्‍ये शनिवार १३ रोजी  महिला बचत गटांना मार्गदर्शन मेळावा संपन्‍न झाला.यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ, जिल्‍हा नियोजनचे निमंत्रित सदस्‍य सचिन वालावलकर व माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सिंधुरत्‍न समृध्‍द योजनेचे प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक आनंद तेंडुलकर, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, सिंधुरत्‍न समृध्‍द योजनेचे समन्‍वयक सुरज परब व महिला बचत गटांच्‍या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्‍या.
  महिलांना स्‍वयंपूर्ण होणेसाठी तसेच त्‍यांची आर्थिक उन्‍नती व्‍हावी या उदात्‍य हेतुने सिंधुरत्‍न समृध्‍दी योजने अंतर्गत ७५ टक्‍के अनुदानीत कर्ज प्रस्‍तावावर श्री आनंद तेंडुलकर यांनी महिला बचत गटांना प्रस्‍तावनिहाय सविस्‍तर मार्गदर्शन केले. यामध्‍ये काजु प्रक्रिया युनिट, मसाला व्‍यवसाय, पापड उद्योग, पीठ उद्योग, खाद्य पदार्थ अशा अनेक व्‍यवसायसाठी आवश्‍यक असणारी मशिनरी व  आवश्‍यक असणा-या कागदपत्रांची माहिती व त्‍यातून उत्‍पादीत  मालाची विक्री कशा प्रकारे करावयाची याबाबत माहिती दिली. 
 श्री. सचिन वालावलकर यांनी सिंधुरत्‍न समृध्‍द योजनेबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
  DAY-NULM अंतर्गत स्‍थापित महिला बचत गटांना सर्व बॅकांच्‍या माध्‍यमातून कर्ज सुविधा लवकरात लवकर उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी बँक व्यवस्थापकांशी समन्वय ठेवण्यात येईल, उत्‍पादित मालांना विक्रीसाठी एकसंघ स्‍टॉल उपलब्‍ध करुन दिले जातील असे प्रतिपादन वेंगुर्ला नगरपरिषद मुख्‍याधिकारी  परितोष कंकाळ यांनी केले.