उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मार्गदर्शन मेळाव्याला धनगर समाज नेते सुशांत शेळके यांचा आक्षेप.

सिंधुदुर्ग.
कोकण धनगर समाज रत्नागिरी यांच्यामार्फत रविवार २८ जुलै रोजी उबाठा गटाचा कोकणातील शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा होणार आहे.पाटीदार समाज हॉल घाटकोपर पश्चिम मुंबई येथे हा मेळावा आयोजित केला असून या कार्यक्रमावर धनगर समाज युवा नेते सुशांत शेळके यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे असे म्हटले आहे की हा मेळावा म्हणजे समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि समाजाला एका राजकीय दावणीला बांधण्याचा प्रयत्न हे समाजकंटक करत आहेत.तसेच हा मेळावा यशस्वी होणार नाही कारण उबाठा गटाने आतापर्यंत धनगर समाजाला काय दिले ? हे आयोजकांनी समाजाला सांगावे असा सवालही सुशांत शेळके यांनी केला आहे. स्वतःला नेते व्हायचं म्हणून समाजाला दावणीला बांधता का? असा प्रश्नही त्यांनी आयोजकांना उपस्थित केला आहे.