चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून; पती पोलिसांच्या ताब्यात. देवगड तालुक्यातील महाळुंगे येथील घटना.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून; पती पोलिसांच्या ताब्यात.  देवगड तालुक्यातील महाळुंगे येथील घटना.

देवगड.

   चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या सुराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना देवगड तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडी येथे शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली.
   याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाळुंगे धनगरवाडी येथे पत्नी व एक मुलगा यांच्यासोबत राहत असलेल्या सुनील सदानंद पेडणेकर व ५८ यांनी आपली पत्नी सौ सुप्रिया सदानंद पेडणेकर वय ५० च्या चारित्र्याच्या संशयावरून सुऱ्याने वार करून घराच्या स्वयंपाक घरातच खून केल्याची घटना शुक्रवारी ११:३० च्या सुमारास घडली. सुनील सदानंद पेडणेकर यांची पत्नी सौ सुप्रिया व मुलगा सिद्धेश २७ हे दोघेही महाळुंगे धनगरवाडी येथे राहत होते. सुनील पेडणेकर हे २०२२ पर्यंत पत्नी व मुलांसमवेत मुंबईत राहत होते. मुंबईत त्यांचे स्वतःचे मेडिकल होते ते विकून महाळुंगे येथे ते कुटुंबीयांसोबत आले व धनगरवाडी येथे घर बांधून त्या घरात तिघही राहत होती. त्यांची पत्नी घरी भगतगिरी करीत होती त्यामुळे त्यांच्याकडे लोकांची कायम येजा होत असायची. भगतगिरीसाठी लोक येत असल्याने सुनील हा पत्नीवर संशय घेत होता या संशयातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याने सुनील आपल्यावर संशय घेतो त्याच्या या संशयातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती . शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी स्वयंपाक घरात भांडण सुरू असतानाच त्यांच्या मुलगा सिद्धेश टॉयलेटला गेला होता दरम्यान भांडणाचा मोठमोठ्याने आवाज आल्यानंतर टॉयलेट मधून तो बाहेर आला तेव्हा आई खाली पडलेल्या स्थितीत दिसली. व वडील तिच्यावर सुऱ्याने वार करत होते हे पण पाहिल्यानंतर सिद्धेश यांनी वडिलांना बाजूला करून त्यांच्या हातातून सुरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हातालाही जखम झाली. वडिलांनी त्याच्या आई  आईच्या मानेवर हातावर छातीवर सुऱ्याने वार केल्याने ती जागेवरच निपचीत पडली. सिद्धेश यांनी सुरा काढून घेऊन वडिलांना एका बाजूला शांत बसविले व तात्काळ महाळुंगे पोलीस पाटील आत्माराम तोरसकर व  विजयदुर्ग पोलीस स्टेशन फोन लावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव, विलास राठोड, गणेश भावंड, संतोष डामरे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, विक्रम कोयंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाच्या गुन्हातील मुख्य संशयित सुनील सदानंद पेडणेकर यांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयिताने खुनासाठी वापरलेला सूरा ताब्यात घेऊन पुरावे गोळा केले.
   दरम्यान व घटनास्थळी  उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक थोपडे, आणि कर्मचारी तसेच ठसेतज्ञ टीम दाखल झाली त्यांनी रक्ताच्या डागाचे नमुने घेतले या प्रकरणी विजयदुर्ग पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला. खून करताना झालेल्या झटापटीत संशयित सुनील पेडणेकर यांच्या हातालाही दुखापत झाली आहे .खुनामधील संशयित सुनील पेडणेकर यांचा मुलगा सिद्धेश मुंबईत असताना ग्राफिक डिझायनरचे काम करीत होता महाळुंगे येथे आल्यानंतर तो वर्क फॉर्म होम काम करत होता. तर वडील हे घरीच असायचे.
 आई भगतगिरी करीत असल्याने त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात लोक येत होते. त्या लोकांवर सुनील हा संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नी यामध्ये वारंवार  भांडणे होत होती अखेर या भांडणाचा उद्रेक होऊन चरित्राच्या संशयावरून सुनील यांनी पत्नी सौ सुप्रिया हिच्या सुऱ्याने स्वयंपाक घरातच वार करून निर्घृण खून केला खुनाच्या या घटनेने महाळुंगे गाव हादरले आहे.