घरावर कोसळला बर्फाचा गोळा

घरावर कोसळला बर्फाचा गोळा

 

मालवण

 

   राज्यात उन्हाचा पारा वाढला असताना मालवण तालुक्यातील देवली परबवाडी येथे खळबळजनक व आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथील विजय देऊलकर यांच्या घरावर भलामोठा बर्फचा गोळा कोसळला. यात घराच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच सरपंच शाम वाक्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली व कुटुंबासोबत चर्चा केली.गारा प्रमाणे बर्फ गोळा पडला की अन्य काही कारण असेल याचा तपास हवामान विभाग अथवा प्रशासनाकडून झाल्यास त्यांना सोईचे ठरेलं यां दृष्टीने बर्फ गोळा फ्रिज मध्ये ठेवण्यात आला आहे.अर्चना विजय देऊलकर या घरात होत्या. त्यावेळी स्वयंपाक घरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. त्यांनी पाहिले असता बर्फचा गोळा दिसून आला तर घराच्या छप्परची कौले रीपा तुटून नुकसान झाले होते. भर उन्हाळ्यात भलामोठा बर्फचा गोळा पडला कुठून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून सर्वत्र याबाबत चर्चा सुरू आहे.