देवगड आगाराच्या चंदन फोंडके यांना 'लालपरी गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित
देवगड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देवगड आगाराचे चालक तथा वाहक चंदन सुरेश फोंडके यांना एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात 'लालपरी गौरवरत्न पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. प्रामाणिक सेवा, समाजाभिमुख कार्य, उत्कृष्ट उत्पन्नवाढ, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली दक्षता तसेच प्रसंगावधान राखून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक चेतना खिरवाडकर, यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
konkansamwad 
