वेंगुर्ला परबवाडा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० रक्तदात्यांचे योगदान
परबवाडा
कै. रामा शेणई व कै. ऋत्विक शिरोडकर यांच्या स्मरणार्थ आयुष चॅलेंजर मित्रमंडळ परबवाडा, वेंगुर्ले व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे नियोजन रामा शेणई मित्रमंडळ, संजय गावडे मित्रमंडळ व नाना राऊळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे.या प्रसंगी ऑन कॉल रक्तदाते अध्यक्ष दयानंद गवस, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, माजी नगरसेवक उमेश येरम, पोलीस पाटील शिवप्रसाद परब, दाजी गवंडे, ऑन कॉल रक्तदाते उपाध्यक्ष मिनल सावंत, बाळा शिरसाठ, मुख्याध्यापक झोरे सर, समाजसेवा अधीक्षक शिंदे सर, सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठानचे आबा चिपकर, वैशाख गोसावी, आशा सेविका लक्ष्मी शेणई तसेच ऑन कॉल रक्तदाते सचिव बाबली गवंडे यांची उपस्थिती होती.कै. रामा शेणई व कै. ऋत्विक शिरोडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित या उपक्रमातून रक्तदान हीच समाजसेवेची महत्त्वाची वाट असल्याचा संदेश देण्यात आला. आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
konkansamwad 
