सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर ३ महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर......भाजप सिंधुदुर्ग उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर ३ महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर......भाजप सिंधुदुर्ग उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सावंतवाडी

 

       सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर जनसुविधेच्या दृष्टीने तीन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 मार्च 2026 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून सावंतवाडी रोड स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे मंत्रालयाने खालील गाड्यांना सावंतवाडी रोड येथे थांबा देण्यास मान्यता दिली आहे 

1. 12133/12134 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मंगळुरू एक्सप्रेस 
2. 12431/12432 तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 
3. 12201/12202 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस 

    या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.भाजप सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी याबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकणातील जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच संवेदनशील राहिले आहेत. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळेच सावंतवाडी रोड स्थानकाला ही महत्त्वाची सुविधा मिळाली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांनी विशेष आभार मानले.या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.