आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा काढण्याचा निर्णय

आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा काढण्याचा निर्णय

 

वेंगुर्ला

 

       वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व आंबा-काजू बागायतदार संघटनेच्या सभेत आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. येत्या गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता शेतकरी आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा वेंगुर्ला एसटी डेपो ते तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला व कृषी विभाग वेंगुर्लावर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोर्चाच्या प्रमुख मागण्या

- क्षेत्र मर्यादेचा निकष काढून टाकून प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करावी.
- हवामानातील बदलामुळे आंबा-काजू पिकाचे नुकसान झालेल्या बागायतदारांना भरपाई मिळावी.
- काजू पिकासाठी हेक्टरी नुकसान भरपाई ३ लाख जाहीर करावी.
- पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.

         बागायतदारांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना अध्यक्ष श्री. संजय गावडे, एम के गावडे, प्रकाश गडेकर, शिवराम आरोलकर, विजय सरमळकर, चेतन कुबल, सौरभ कुबल, स्वप्निल शिरोडकर, भूषण नाबर, पांडू गावडे, बबन साळगावकर, नितेश मयेकर यांनी केले आहे.