मदर तेरेसा स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न

मदर तेरेसा स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न

वेंगुर्ला

 

     मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे गुरुवारी नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो यांनी मुख्य विद्यार्थी Head Boy, मुख्य विद्यार्थिनी Head Girl तसेच सर्व सभागृहांच्या कर्णधारांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि निष्ठेने आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ घेतली. यावेळी श्री. विनायक ठाकूर यांनी विद्यार्थी नेत्यांना मार्गदर्शन करत नेतृत्वाची जबाबदारी समजावून सांगितली. मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो यांनी विद्यार्थी नेत्यांना नेतृत्व, शिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठा विकसित व्हावी, असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. शिल्पा चव्हाण यांनी केले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हा शपथविधी समारंभ उत्साहात पार पडला.