नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील - प्रभाकर सावंत
वेंगुर्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत अनेक समाजाभिमुख योजना राबवून देशाचा सर्वच क्षेत्रात कायापालट घडवला आहे. रासायनिक शेतीचे परिणाम व पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता त्यांनी नैसर्गिक शेतीचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कृषी व पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे. पुढील पाच ते दहा वर्षांत शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने मंगळवार 30 जून रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे मोदी सरकारच्या बारा वर्षेपूर्तीनिमित्त प्राकृतिक शेती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर किसान मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, जिल्हा संयोजक उमेश सावंत, जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, फळबाग तज्ञ डॉ. रणजीत देव्हारे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. सागर मोरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, पं. स. सभापती शंकर घारे, जि. प. सदस्य विजय नाईक, आत्मा कमिटी अध्यक्ष नितीन मांजरेकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, संचालक वसंत तांडेल, व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस प्रमुख बाळकृष्ण गावडे, नागपूर येथील जैविक शेतकरी चंद्रशेखर पारखी यांच्यासह नगरसेवक, सरपंच, प्रगतशील शेतकरी व भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आरवली येथील प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांना शेतकरी फेलो पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी केले व प्रसन्ना देसाई यांनी आभार मानले.
konkansamwad 
