टोल माफीचा शब्द पालकमंत्री यांनी पाळावा - अनिल केसरकर

टोल माफीचा शब्द पालकमंत्री यांनी पाळावा - अनिल केसरकर

सावंतवाडी


        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका सोमवार दिनांक १७ ऑगस्ट पासून अधिकृतपणे सुरू होत आहे. मात्र टोलनाका सुरू होण्यापूर्वीच जिल्हा पासिंगच्या वाहनांना टोलमाफी मिळणार की नाही याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सुरुवातीला या टोलनाक्याला जिल्हावासियांचा तीव्र विरोध होता. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पासिंगच्या सर्व वाहनांना टोलमधून सूट देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. आता टोलनाका प्रत्यक्ष सुरू होत असताना त्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही.सध्या केंद्र सरकारच्या नियमानुसार सर्व वाहनांसाठी फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे टोलनाका ओलांडताच थेट बँक खात्यातून टोलचे पैसे ऑटोमॅटिक कट होतात. त्यामुळे जिल्हा पासिंग वाहनांना प्रत्यक्षात सूट कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, "पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. जिल्हा पासिंगच्या वाहनांसाठी टोलमाफी तात्काळ लागू करावी आणि त्यांच्यासाठी टोलनाक्यावर स्वतंत्र वाहतूक लाईन सुरू करावी. जर १७ तारखेपासून जिल्ह्यातील वाहनांकडून टोल वसूल केला गेला तर मनसे स्टाईलने टोलनाक्याविरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल."टोलनाका सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने याबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी आता जिल्हाभरातून होत आहे.