जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत दिक्षा चव्हाण विजेती; सागर ढवळ उपविजेता
कुडाळ
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोकण संसद समृद्धी महोत्सव 2026 जिल्हाभर साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कुडाळ यांनी यानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवली येथील दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अवधूत भणगे, उपाध्यक्ष. सुनील धुरी व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कॅरम बोर्डवर ब्रेक करून करण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या नवीन सुपर सिक्स चॅलेंजर फॉरमॅटमध्ये जिल्हास्तरीय खुल्या गटामधे ही स्पर्धा खेळविण्यात आली. जिल्हाभरातून 64 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. दुसऱ्या फेरीपासूनच स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. या स्पर्धेतील मागील वर्षीचा उपविजेता कुडाळचा प्रशांत म्हात्रे याच्यावर कुडाळ कॅरम क्लबच्या सिद्धेश शिवडावकरने तिसऱ्या सेटमध्ये विजय मिळवत स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. मालवण येथील ज्येष्ठ खेळाडू राजू पावसकर यांनी उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.
konkansamwad 
