खर्डेकर महाविदयालयाच्या कनिष्ठ विभागाचा क्रिडा महोत्सव दिमाखात संपन्न.

खर्डेकर महाविदयालयाच्या कनिष्ठ विभागाचा क्रिडा महोत्सव दिमाखात संपन्न.

वेंगुर्ला.

   बॅ.खर्डेकर महाविदयालयाच्या कनिष्ठ विभागाचा क्रिडा महोत्सव दि. १२ डिसेंबर २०२२ ते १६ डिसेबर २०२३ या चार दिवसात दर वर्षाप्रमाणे  दिमाखात संपन्न झाला. बी. के.सी इंडियनस व बी के सी चॅलेंजरसने या दोन संघामध्ये मूलांच्यात अंतिम क्रिकेट सामना खेळण्यात आला. यामध्ये बी के सी चॅलेंजरसने विजतेपद तर बी के सी इंडियनस संघाने उपविजेतेपद संपादन केले. मुलीमध्ये बी के सी एव्हीएटर व बी के सी शुटिंग स्टार यामध्ये अंतिम सामना रंगला बी के सी शुटिंगस्टार या संघाने विजेते पद संपादन केले. मुलामध्ये मालीकावीर मंदार खोत, फलंदाज सुयश मोंडकर, उत्कृष्ठ गोलदांज पार्थ सावंत मानकरी ठरले तर मुलीमध्ये उत्कृष्ठ फलंदाज म्हणून निकिता फर्नांडिस तर उत्कृष्ठ गोलंदाज कीर्ती पालव म्हणून मानकरी ठरले.
   या सामन्याच्या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दत्तप्रसाद नर्सरीचे मालक उमेश येरम, प्राचार्य डॉ. एम.बी चौगले. डॉ. सी डी एस पाटील. क. विभागाचे पर्यवेक्षक डी जे शितोळे, श्री सुरेन्द्र चव्हाण, व्यावसायिक विभागप्रमुख डी. एस.पाटील, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
   क्रिडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रा.व्ही.पी देसाई व क्रिडा शिक्षक प्रा. हेमत गावडे तसेच सर्व प्राध्यापकाचे मोलाचे सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेचे गुणलिखाण प्रा.पी .एम देसाई सर यांनी केले. तर पंच म्हणून प्रा.अनिकेत कदम, प्रा. मडिवाळ, प्रा. मेतरे यांनी काम पाहिले.
    क्रिडा महोत्सवातील विजेत्या संघाना व खेळाडूना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रनकौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी देसाई मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.