परुळे येथे १५ जानेवारीपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा नाट्यमय थरार......विजेत्यांना आकर्षक पारितोषिके
परुळे
नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. परुळे युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व. ॲड.अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे ३६ वे वर्ष असून दि. १५ ते १७ जानेवारी २०२७ या तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.नाट्यकलेला प्रोत्साहन देणे, नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि कोकणची सांस्कृतिक परंपरा जपणे हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे.
आकर्षक पारितोषिके
स्पर्धेत विजेत्या संघांसाठी रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
- प्रथम क्रमांक - १५,००० रुपये
- द्वितीय क्रमांक - १२,००० रुपये
- तृतीय क्रमांक - ८,००० रुपये
- चतुर्थ क्रमांक - ५,००० रुपये
याशिवाय सांघिक आणि वैयक्तिक अशी इतरही अनेक पारितोषिके देण्यात येणार आहेत.ही स्पर्धा श्री देव आदिनारायण मंदिर येथील रंगमंचावर पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी दि. २५ डिसेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या १२ संघांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असल्याने इच्छुकांनी लवकर संपर्क साधावा.अधिक माहिती व नावनोंदणीसाठी श्री. प्रथमेश नाईक - ९४२३०५१६८७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे."नाट्य हेच जीवन, नाट्य हेच समाजाचे आरसे" या विचारातून होणाऱ्या या स्पर्धेमुळे रसिकांना पुन्हा एकदा दर्जेदार कलाविष्कार अनुभवता येणार आहे.
konkansamwad 
