आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या फंडातून सोलार पॅनलचे वाटप

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या फंडातून सोलार पॅनलचे वाटप

रत्नागिरी


       रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे  यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वाटप करण्यात आले.कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप करण्यात आले. स्वतः शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरा गो जागुष्टे विद्यालय रत्नागिरी येथे हा कार्यक्रम झाला. शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे, अनेक शाळांना लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, दुर्गम डोंगराळ भागामध्ये  लाईट सुद्धा खंडित होत असते, या सर्वांचा विचार करून  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे स्वप्न  पूर्ण करण्याचा हा प्रयत्न केला असल्याचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले. राजापूर मधील १६ शाळा, लांजा मधील १६ शाळा, संगमेश्वर मधील १५ शाळा आणि रत्नागिरी मधील १६ शाळांना अशा ६३ शाळांना सुमारे १ कोटी ६० लाखाचे  सोलर सिस्टिम साहित्य वाटप करण्यात आले,  सदर साहित्य फिटिंग करण्यासाठी पॅनल बॅटरी यूपीएस  आणि वायरिंग फिटिंग साठी  साहित्य घेऊन शाळांना दिले जाणार आहे. सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यानंतर, त्याची निगा आणि देखरेख विषय सुद्धा माहिती देण्यात आली. उर्वरित शाळांना दुसऱ्या टप्प्यात  सोलर पॅनल  देण्यात येतील, आज पर्यंत कोकण विभागात कोणकोणती काम केली त्याबद्दल माहिती दिली तसेच अनुदान, पेन्शन, अर्धवेळ शिक्षक, विद्यार्थी निकष, शाळा तेथे मुख्याध्यापक, TET, अशैक्षणिक कामे, वेतनेतर अनुदान व अन्य शैक्षणिक विषयांवर, करत असलेली पाठपुराव्या बद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे  यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा भाजपा सरचिटणीस ओमकार फडके, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, लांजा तालुका अध्यक्ष विराज हरमळे, लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, मनोज पाटणकर, निलेश आखाडे, रा गो जागुष्टे  शाळेच्या कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर, उपाध्यक्ष सुनीता भावे, गजानन तारगावकर, लतेश मामा नांदगावकर, विलास दादा म्हात्रे, महेश पाटकर, राजेश जाधव, सतीश पुजारी, विलास कोळेकर, अमोल सरनोबत, भास्कर झोरे. उपस्थित् होते.