कोकणात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता; रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

कोकणात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता; रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

पुणे.

   कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात काही जिल्ह्यात अतिमुळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई पुण्यासह विदर्भात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते हलक्या सरी कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
    पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीवरील किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ दरम्यान सक्रिय आहे. आज कोकण मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात आज १८ जुलैला रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गला पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
   मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूरला आज १८ जुलैला, साताऱ्यात १८ ते २० च्या दरम्यान घाट विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात १८ २१ जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.