कणकवलीत सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वेचे उत्साहात स्वागत
कणकवली
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली रेल्वे स्थानकात सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आज सकाळी १२ वाजता ही रेल्वे कणकवली स्थानकात दाखल झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले. मुंबई आणि कोकणातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सीएसएमटी-सावंतवाडी ही एक्सप्रेस गाडी आजपासून नियमितपणे सुरू झाली. सीएसएमटी स्थानकातून काल (ता.८) रात्री ११.५५ वाजता निघालेली ही गाडी आज दुपारी १२ वाजता कणकवली स्थानकात दाखल झाली. कणकवली रेल्वे स्थानकात या रेल्वेला थांबा मिळाल्याने कणकवलीसह मालवण, देवगड, विजयदुर्ग तसेच परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबई आणि कोकणातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या रेल्वेमुळे अधिक सोयीची प्रवासी सेवा उपलब्ध झाली आहे. कणकवली स्थानकात आलेल्या या एक्सप्रेसच्या स्वागतावेळी रेल्वे प्रवासी समन्वय समिती कणकवलीचे कार्याध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे, कणकवली रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत, नगरसेवक लूकेश कांबळे, समाजसेवक संजय मालंडकर यांच्यासह सुमित राणे, निलेश मोरे, रामदास ठाकूर, दीपक माडगूत, बंटी सावंत, आनंद कदम, निलेश सावंत, उमेश वाळके तसेच अनेक प्रवासी उपस्थित होते.
konkansamwad 
