नरकासुर निर्मितीत तरुणाई दंग — परुळे परिसरात दिवाळीचा उत्साह
परुळे
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परुळे परिसरात तरुणाई नरकासुर बनविण्यात दंग झाली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध आकारांचे, आकर्षक आणि कलात्मकतेने सजवलेले नरकासुर आकार घेत आहेत.
मुलांच्या परीक्षा संपल्याने सुट्यांचा आनंद अधिकच वाढला आहे. किल्ला बांधणीसोबतच नरकचतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या नरकासुर दहनासाठी तरुणाई आणि लहान मुले उत्साहाने तयारी करत आहेत.
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांकडून नरकासुर स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, यातून मुलांच्या कलात्मक बुद्धीला चालना मिळते तसेच सणाचा आनंदही द्विगुणित होतो.
कोकण आणि गोवा परिसरात या अनोख्या परंपरेचा जल्लोषपूर्ण अनुभव घेण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.

konkansamwad 
