वेंगुर्ल्याच्या रुपाली पाटील यांची विधी स्वयंसेविका पदी निवड

वेंगुर्ले
साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेच्या संचालिका रुपाली दीपक पाटील यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले यांच्यातर्फे 2025-2026 या कालावधीसाठी विधी स्वयंसेविका म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले यांच्यामार्फत प्रत्येक गावात कायदेविषयक जनजागृती करणे, दुर्बल घटकांना विधी सहाय्यतेबद्दल माहिती देणे, प्राधिकरणमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे ही त्यांची मुख्य जबाबदारी राहील. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षांकडून याबद्दलचे नियुक्तीपत्र रुपाली पाटील यांना प्राप्त झाले आहे.