उद्या जिल्हास्तरीय समितीची बैठक.
सिंधुदुर्ग.
जिल्ह्यातील काही भागात सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व त्यांच्या परिवाराला समाजातील इतर नागरीकांकडून मानसिक व शारीरीक त्रास देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याअनुषंगाने गठित केलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या खात्या संदर्भातील तक्रारी असतील, त्यांनी तक्रारी संदर्भातील कागदपत्रे घेऊन या बैठकीस उपस्थित राहवे,असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.