लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करी कारवाईसाठी सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क सज्ज.
सावंतवाडी.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग विभागाने 01 मार्च 2024 पासुन गोवा राज्यातील अवैध मद्य वाहतुक / विक्री प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत एकुण 21 गुन्हे नोंदवुन यामध्ये पाच वाहनांसह 20,32,830/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 22 गुन्हेगारांविरोधात कारवाई केली आहे. तसेच गोवा राज्यालगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात रस्त्यावर तात्पुरते तपासणी नाके उभारले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन संशयीत वाहनांची कसुन तपासणी करुन गोवा राज्यातुन चोरट्या मार्गाने येणाऱ्या मद्यावर कटाक्षाने पाळत ठेवली जात आहे. या दारू वाहतुकीवर कठोर कारवाई करणेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रदीप रासकर यांनी दिली आहे.