असलदे विकास सोसायटीचा जिल्हा बँकेकडून सन्मान.
सिंधुदुर्ग.
कणकवली तालुक्यात ३८ विकास संस्थामध्ये स्तरावर १०० टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीची निवड झाली आहे, तर जिल्ह्यात २३० विकास संस्थांमध्ये अवघ्या ६ संस्था आहेत,त्यात असलदे विकास संस्था ही संस्था स्तरावर १०० टक्के कर्ज वसुली अग्रस्थानी राहिली.त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर संचालक आ.नितेश राणे, महेश सारंग यांच्या हस्ते असलदे चेअरमन भगवान लोके यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तिपत्रक, बक्षीस रक्कम १५ हजार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
ओरोस येथील शरद भवन सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४० व्या सर्वसाधारण सभेत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण,व्हिक्टर डाटन्स,सुशांत नाईक आदींसह मान्यवर उपस्थित होते.तर सन्मान स्वीकारताना सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, उदय परब, शामु परब, विठ्ठल खरात, प्रकाश खरात, कांचन लोके, अनंत तांबे, संतोष परब, सुनिता नरे, सचिव अजय गोसावी, संदीप नरे आदी उपस्थित होते.