दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फ्लाय९१ कडून अतिरिक्त उड्डाणांची घोषणा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फ्लाय९१ कडून अतिरिक्त उड्डाणांची घोषणा

 

पणजी
 

     दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी संख्येला प्रतिसाद देत, प्रादेशिक विमान सेवा फ्लाय९१ने पश्चिम आणि दक्षिण भारतातील महत्त्वाच्या मार्गांवर सणासुदीच्या काळासाठी विशेष अतिरिक्त उड्डाणांची घोषणा केली आहे. दिवाळीत वाढलेल्या प्रवासी मागणीचा विचार करून फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेने १७ ऑक्टोबर रोजी गोवा-बेंगळुरू-गोवा आणि सिंधुदुर्ग-बेंगळुरू-सिंधुदुर्ग या मार्गांवर विशेष उड्डाणे जाहीर केली आहेत. तसेच १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी गोवा-बेंगळुरू-गोवा, गोवा-हैदराबाद-गोवा आणि सिंधुदुर्ग-हैदराबाद-सिंधुदुर्ग या मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय, २१ ऑक्टोबर रोजी गोवा-पुणे-गोवा या मार्गावरही एक विशेष उड्डाण नियोजित करण्यात आले आहे. सर्व उड्डाणांची तिकिटे आता फ्लाय९१च्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगसाठी उपलब्ध आहेत."दिवाळी हा कुटुंबीयांना एकत्र आणणारा सण आहे. या काळात अनेक जण आपल्या गावी परतण्यासाठी प्रवास करतात, त्यामुळे प्रवासाची मागणी स्वाभाविकपणे वाढते. प्रवाशांना सणासुदीच्या काळात अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव देता यावा, यासाठी आम्ही ही विशेष उड्डाणे सुरू केली आहेत," असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.फ्लाय९१ने पुढे सांगितले की, १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून बुक केलेल्या प्रत्येक तिकिटावरून मिळणाऱ्या रकमेतील रु. १०० इतकी देणगी बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या एका धर्मादाय संस्थेला दिली जाईल. या उपक्रमातून सणाचा आनंद वंचित मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.भारतभर उत्साहाने साजरी होणाऱ्या दिवाळीच्या काळात देशांतर्गत प्रवासाची संख्या लक्षणीयरीत्या वाढते, कारण लोक आपल्या कुटुंबासोबत एकत्र येण्यासाठी प्रवास करतात. या उच्च मागणीच्या काळात फ्लाय९१ने क्षमतेत वाढ करून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपली तत्परता अधोरेखित केली आहे. याआधी, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरही एअरलाइनने पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर अतिरिक्त उड्डाणांची घोषणा केली होती.गोव्यात मुख्यालय असलेली फ्लाय९१ विमानसेवा आपला प्रादेशिक विस्तार सातत्याने वाढवत आहे. सध्या ही विमानसेवा देशातील आठ ठिकाणांना जोडते. ज्यामध्ये, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर आणि पुणे ही चार शहरे, तसेच लक्षद्वीपमधील अगत्ती या मार्गांचा समावेश आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करून आणि स्थानिक विकासाला चालना देणे हे फ्लाय९१ चे उद्दिष्ट आहे.