सावंतवाडी तालुक्यात दिसला 'किंग कोब्रा'.....वन विभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात
सावंतवाडी
सरमळे आणि दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले परिसरात दोन अत्यंत दुर्मिळ किंग कोब्रा साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सरमळे येथील मॅथ्यु शॉबिन यांच्या रबर प्लांटेशनमध्ये एक मोठा साप दिसल्याची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सापाचे यशस्वी रेस्क्यू केले असता, तो तब्बल १२ ते १५ फूट लांबीचा किंग कोब्रा असल्याचे स्पष्ट झाले.सावंतवाडी तालुक्यात किंग कोब्रा आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याने तर दोडामार्ग तालुक्यात तळकट येथे यापूर्वी किंग कोब्रा आढळून आला होता निसर्गप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. साप पकडल्यानंतर तातडीने सावंतवाडी वन विभागाला या घटनेची कल्पना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनेची सत्यता तपासून आणि सापाची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्याला वनकर्मचारी व जलद बचाव पथकाच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ही संपूर्ण मोहीम उप वनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक पवन तारपे, रामचंद्र रेडकर, शुभम पाठक आणि शुभम कळसुलकर या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
konkansamwad 
