सोन्याचे बनावट दागिने दाखवून साडेतीन लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांकडून अटक

सोन्याचे बनावट दागिने दाखवून साडेतीन लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांकडून अटक

संगमेश्वर

 

       सोन्याचे बनावट दागिने दाखवून तीन लाख रुपयांची रक्कम फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र कुमार मोहनलाल परमार राहणार राजस्थान असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 2 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.दिलेश प्रकाश गुजर राहणार बेनी खुर्द गुजरवाडी तालुका लांजा यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दिलेश प्रकाश गुजर हे 20 एप्रिल रोजी लांजा येथे यंग लूक कपड्याचे दुकानात कामाला असताना जितेंद्र कुमार मोहनलाल परमार आणि एका व्यक्तींनी दुकानात येऊन आमच्याकडे काही सोने आहे ते आमच्या गावाकडे लग्न आहे त्या आर्थिक अडचणीमुळे ते विकायचे आहेत असे सांगून त्यांच्याकडील जोंधळी मणी सोन्याचे दागिने दाखवून त्यांनी त्याच्याकडील त्याच्यासारखे असलेल्या जोंधळी मणी दागिन्यातील तारे गुंफलेले दोन-तीन मनी दिले याची खात्री केली त्यानंतर साडेतीन लाख किमती ते दागिने खरेदी करण्याचा व्यवहार झाल्याने जितेंद्र कुमार परमार आणि दुसरे एका व्यक्तीने संगमेश्वर एसटी स्टँड येथे येण्यास सांगितल्याने २८ एप्रिल रोजी जोंधळी मणी सोन्याचे तारेत गुंतवलेल्या हारासारखे दागिने हे सोने खरे असे सांगत दागिने साडेतीन लाखाची फसवणूक केली होती. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तपास करत आरोपी जितेंद्र कुमार मोहनलाल परमार याला अटक केली आहे तसेच या प्रकरणी फरार आरोपीला लवकरच पोलीस जेरबंद करतील असे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी सांगितले.