वैभववाडी येथील नाधवडेत एसटीला डंपरची धडक

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे कांबळे हॉटेल येथे बस थांब्यावर उभ्या असलेल्या एस टी बसला डंपरने मागून धडक दिली. या अपघातात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर एस. टी बसचे नुकसान झाले आहे. विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग ते वैभववाडी ही बस घेऊन बस चालक व वाहक हे वैभववाडीच्या दिशेने येत होते. दरम्यान नाधवडे कांबळे हॉटेल येथे बस थांब्यावर प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबली असताना तरेळेहुन वैभववाडीच्या दिशेने डंपर चालक हा आपल्या ताब्यातील डंपर घेऊन येत होता. त्याने बस थांब्यावर उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली.या अपघातात बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. तर एस टी बसच्या मागच्या भागाचे तसेच बसच्या दर्शनी भागाची काच डंपरच्या जोरदार धडकेत फुटली आहे.