जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी घेतले ओटवणेतील रवळनाथाचे दर्शन

सावंतवाडी
ओटवणे येथील दसरोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकार यांनी ओटवणे येथील श्री रवळनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दसऱ्याचा सण आणि राजेशाईचा सण कशाप्रकारे साजरा केला जातो, याबाबतची माहिती जाणून घेतली आणि ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि ओटवणे बीटचे पोलीस नाईक राऊत यांनीही रवळनाथाचे दर्शन घेतले. यावेळी गावचे सरपंच दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, रवींद्र म्हापसेकर, पोलिसा पाटील शेखर गावकर, बाळ गावकर तसेच गावातील मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या निमित्ताने डॉ. दहिकार यांचा यावेळी सन्मान देवील करण्यात आला.