सावंतवाडी येथे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी येथे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी

 

   संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी येथील हॉटेल मँगोच्या सभागृहात आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. गेली काही वर्षे मी स्वतःहून माझा वाढदिवस साजरा करीत नाही. पण संजू सारखे माझे मित्रच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करतात. त्यांचे हे प्रेमच मला अधिक ऊर्जा देते. मला कधी देव भेटला नाही पण जीवनात देवासारखी अनेक माणसे भेटली याचाच आनंद आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांप्रती ऋण व्यक्त केले. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. मी मागील दहा वर्षात खूप काही पाहिल. खूप संघर्ष करावा लागला.वास्तविक पाहता राणे म्हणजेच संघर्ष. मागील काही वर्षात खूप सहन केले. विरोधक आमच्या घरापर्यंत पोहोचले होते.केलेला संघर्ष खूप मोठा होता.अनेक किल्ले ढासळत असताना राणेंचा गड मात्र शाबूत ठेवला हीच खरी ताकद आहे.या संघर्षाच्या काळात संजू परब यांच्यासारखे अनेक खंदे कार्यकर्ते भावाप्रमाणे माझ्या सोबत राहिले. कार्यकर्त्यांचे हेच प्रेम माझी खरी ताकद आहे असेही ते म्हणाले. संजू तुझे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. संजू नेहमी नवनवीन पद्धतीने वाढदिवस साजरा करतो.तो माझा भाऊच आहे.त्यामुळे हक्काने बोलतो.तुमचे हे प्रेम नेहमीच असेच माझ्या पाठीशी राहू दे, मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.