शिरोडा येथे नशा मुक्ती अभियान अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन

वेंगुर्ला
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा येथे नशा मुक्ती रॅली काढण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम यांनी अ.वि. बावडेकर विद्यालयाच्या मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. कदम यांनी नशेचे दुष्परिणाम सांगितले त्यामुळे कुटुंब कसे उध्वस्त होते, गुन्हेगारी वाढते याबाबत मुलांना मार्गदर्शन केले तसेच तरुण पिढीला वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे व यासाठी पोलीस विभाग, शाळा, ग्रामपंचायत, पालक, मित्रपरिवार यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे व तरुण पिढीने खेळ, व्यायाम, सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन, कौशल्य विकास यामध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचे आवाहन केले व जनजागृतीसाठी शिरोडा बाजारपेठ येथे रॅली काढण्यात आली. यावेळी अ.वी. बावडेकर विद्यालयचे मुख्याध्यापक मंगेश कांबळी, शिक्षक, कर्मचारी, पालक, माजी सरपंच मनोज उगवेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम, पोलीस पाटील सनी मोरजकर व तांडेल हे उपस्थित होते.