आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात पोलिसांचे संचलन.
देवगड.
आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ७ मे २०२४' रोजी जनतेने निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने देवगड पोलिसांनी देवगड जामसंडे शहरात या ठिकाणी पोलीस संचलन केले आहे. यामध्ये ६ पोलीस अधिकारी, ८३ पोलीस अंमलदार, १० होमगार्ड यांचा समावेश होता.
यावेळी डीवायएसपी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक देवगड अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक आचरा पोलीस ठाणे सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर असे वरीष्ठ पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड आदींचा संचलन मध्ये सहभाग घेतला.