वेंगुर्ला तालुक्यातील परुळे ग्रामपंचायतीतर्फे गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान

वेंगुर्ला तालुक्यातील परुळे ग्रामपंचायतीतर्फे गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान

 


वेंगुर्ला

 


   परुळे बाजार ग्रामपंचायतीकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, सरपंच  प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, सदस्य नमिता परुळेकर, माजी सरपंच श्वेता चव्हाण, प्राजक्ता चीपकर, पोलीस पाटिल जान्हवी खडपकर त्याचबरोबर महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील तीन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर परुळे गावातील प्रसिद्ध पखवाज वादक राजाराम परुळेकर यांचा राज्यपातळीवर पखवाज वादनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांचादेखील सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला वर्गाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल माजी सभापती निलेश सामंत यांनी मार्गदर्शन करून यातून प्रेरणा घेऊन काम करावे असे आवाहनही केले.